Posts

Showing posts from April, 2020

मी

     मी दमनाच्या मुळावरचा प्रहार झालो      माणसांच्या गळ्यामधला रे हार झालो      खुशाल करा माणुसकीवर हल्ले तुम्ही      हल्ल्यावरचा खोलवर मी वार झालो      खबरदार रांझ्याचा पाटील बनू नका रे     मी छत्रपतींच्या तलवारीची धार झालो     आपल्यांनीच दूर लोटले मला जरीही      डोईवरचा नाही त्यांच्या भार झालो      दुःखाने पडले कोसळून जे भोवताली      आसवे पुसून त्यांची आज मी आधार झालो       धर्मजातीचे साप विषारी खुशाल सोडा       मी प्रेमाच्या शब्दकोषातला सार आहे       करा दुष्मनी माझ्यासोबत तुम्ही  सारे      कळणार पण नाही कधी तुमचा यार झालो               *प्रा.प्रकाश नाईक*८३७८८४९५९