मी
मी दमनाच्या मुळावरचा प्रहार झालो माणसांच्या गळ्यामधला रे हार झालो खुशाल करा माणुसकीवर हल्ले तुम्ही हल्ल्यावरचा खोलवर मी वार झालो खबरदार रांझ्याचा पाटील बनू नका रे मी छत्रपतींच्या तलवारीची धार झालो आपल्यांनीच दूर लोटले मला जरीही डोईवरचा नाही त्यांच्या भार झालो दुःखाने पडले कोसळून जे भोवताली आसवे पुसून त्यांची आज मी आधार झालो धर्मजातीचे साप विषारी खुशाल सोडा मी प्रेमाच्या शब्दकोषातला सार आहे करा दुष्मनी माझ्यासोबत तुम्ही सारे कळणार पण नाही कधी तुमचा यार झालो *प्रा.प्रकाश नाईक*८३७८८४९५९